केवळ दोन तासात तब्बल अडीज इंच पाऊस : वाळपई शहरासह बराच मोठा परिसर जलमय,वादळी वाऱयामुळे झाडे, घरांची पडझड शक्य,शेती, बागायतीचे नुकसान झाल्याचा अंदाज

प्रतिनिधी /वाळपई
परतीच्या पावसाने काल शुक्रवारी सत्तरी तालुक्मयाला आणि विशेषतः वाळपई शहराला दोन तास मुसळधार पावसाने झोडपून काढले. अवघ्या दोन तासांमध्ये अडीच इंच पावसाची नोंद झाली. पावसाळी मोसमात एवढे पाणी वाळपई भागामध्ये कधीच भरले नव्हते. वाळपईतील मारुती मंदिर, मध्यवर्ती बाजार व सरकारी सामाजिक रुग्णालयासमोरील रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. वादळी वाऱयामुळे झाडे, घरांची पडझड झाल्याची माहिती हाती आलेली आहे. शेती, बागायतीची नुकसानी होण्याचाही अंदाज आहे. अचानकपणे सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. नद्यांच्या पातळीत वाढ झाल्याने सारा परिसर जलमय झाल्याचे दिसत होते.

दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास अचानकपणे मुसळधार पाऊस सुरू झाला. एक प्रकारे ढगफुटी झाल्याचे चित्र पाहावयास मिळाले. यामुळे वाळपई शहरात मोठय़ा प्रमाणात पाणी भरल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. वाळपई शहरातील श्री हनुमान मंदिराच्या समोर प्रचंड प्रमाणात पाणी भरले होते. नागरिकांना रस्ता ओलांडणे शक्मय होत नव्हते. वाहने अडकून पडली. मंदिराच्या जवळ असलेल्या अनेक घरांमध्ये पाणी घुसण्याचा प्रकार घडला. मात्र किरकोळ वगळता मोठी नुकसानी झाली नाही.

सारा परिसर झाला जलमय
सरकारी सामाजिक रुग्णालयासमोरचा परिसरही जलमय झाला होता. वाळपई कोर्ट ते सामाजिक रुग्णालयापर्यंतचा रस्ता पाण्याखाली गेला होता. अनेक वाहनचालकांनी रस्त्यावरुन जाण्याचा प्रयत्न केला, मात्र वाढलेल्या पाण्यामुळे अनेक वाहने पाण्यामध्ये अडकून पडली. यामध्ये काही दुचाकी व चारचाकी वाहनांचाही समावेश होता. नागरिकांच्या मदतीने ही वाहने पाण्यातून बाहेर काढण्यात आली. कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नाही. वाहनांची मात्र मोठय़ा प्रमाणावर नुकसानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

दोन तास वाहतूक रखडली
जवळपास दोन तास रस्ता पाण्याखाली गेला होता. यामुळे होंडा भागातून वाळपई शहराकडे व शहरातून होंडा भागाच्या दिशेने जाणारी वाहने मोठय़ा प्रमाणात अडकून पडली होती. जवळपास एक मीटर रस्ता पाण्याखाली गेला होता. यामुळे वाहतूक करणे शक्मय नव्हते. यामुळे जवळपास दोन तास वाहतूक रखडली होती.
अग्निशामक दलाची धावाधाव
वाळपई अग्निशामक दलाच्या यंत्रणेशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे काही वाहने अडकून पडली. पाण्यामध्ये अडकलेल्या अनेक जणांना बाहेर काढणे शक्मय झाले. कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार व जीवितहानी झाली नाही. जवळपास पाच वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरील पाणी कमी होऊ लागल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली.
शेती, बागायतीची नुकसानी
मुसळधार पावसाबरोबरच वादळी वाऱयाने जोरदार तडाखा दिल्यामुळे सत्तरी तालुक्मयात पडझड होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. सध्यातरी कोणत्याही भागातील रस्ते पडझळीमुळे बंद झालेले नाहीत. मात्र जंगलामध्ये मोठय़ा प्रमाणात नैसर्गिक पडझड होण्याची शक्मयता आहे. शेती, बागायतीची नुकसानी होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही. सध्या भातशेती पिकली असून ती कापण्याच्या टप्प्यात आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून सतत पाऊस लागत असल्यामुळे भात कापणीची कामे खोळंबून पडलेली आहेत. आज मात्र प्रचंड प्रमाणात पाऊस लागल्यामुळे या भात शेतीची मोठय़ा प्रमाणात नुकसानी होण्याचा अंदाज शेतकऱयांनी व्यक्त केलेला आहे.
वीज पुरवठा झाला खंडित
वादळी वाऱयामुळे अनेक भागातील वीज पुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. मात्र दोन तासानंतर वीज पुरवठा सुरु झाल्याने कोणत्याही प्रकारची गैरसोय झाली नाही. काही भागातील वीज पुरवठा रात्री उशिरा पूर्ववत झाला.
नद्यांच्या पाण्यात वाढ
मुसळधार पडलेल्या पावसामुळे नद्यांची उतरलेली पाण्याची पातळी पुन्हा वाढल्याचे दिसून आले. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत म्हादई, रगाडा, वेळूस नदीच्या पाण्याची पातळी बऱयाच प्रमाणात वाढली आहे. नदीला गढूळ पाणी आलेले आहे. सध्यातरी पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतल्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती नसली तरीसुद्धा घाटमाथ्यावर मोठय़ा प्रमाणात पाऊस लागल्यास पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही.
पुढील दोन दिवसांसाठी येलो अर्लट जारी
परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. सत्तरी तालुक्यात ढगफुटी सदृष्य पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. सांखळी, डिचोली तसेच पेडणे, धारबांदोडा आदी परिसरातही दुपारी मुसळधार पाऊस पडला. हवामान खात्याने राज्यात तीन दिवसांकरिता येलो ऍलर्ट घोषित केले आहे. दि. 16 ऑक्टोबरपर्यंत गोव्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे. त्याचा गोव्यावर विपरित परिणाम होणार असल्याचा तसेच गोवा व आसपासच्या परिसरात मुसळधार पावसाचा इशारा शुक्रवारी सकाळीच हवामान खात्याने दिला होता.
दुपारपर्यंत जोरदार वादळी वारे वाहू लागले. दुपारी पूर्वेकडून काळेकुट्ट ढग आणि सोबत जोरदार गडगडाटही सुरु झाला आणि त्यानंतर मुसळधार पाऊस गोव्याच्या सीमेवर म्हणजेच कर्नाटक आणि महाराष्ट्रच्या भागात व तिथून गोव्यात जोरदार पाऊस कोसळला. सत्तरीमध्ये तर ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने जनतेची एकच तारांबळ उडाली. सत्तरीतील जवळपास सर्वच नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली व पाणी गढूळ झाले.
त्यानंतर हा पाऊस सायं. 4.30च्या दरम्यान पणजीकडे सरकला मात्र पणजी व संपूर्ण तिसवाडी तालुक्यात हलक्या स्वरुपात पाऊस सायंकाळी उशिरापर्यंत चालू होता. हवामान खात्याने पुढील दोन दिवसांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. हा परतीचा पाऊस असून तो जोरदार कोसळतो. यापूर्वी कैकवेळा सांखळी, सत्तरी व काणकोणमध्ये परतीच्या पावसामुळे महापूर आले होते मात्र शुक्रवारी पडलेला पाऊस हा केवळ दोन ते तीन तासच राहिला. पुढील दोन दिवस गोव्यावर पावसाचा अंमल राहील असा इशारा वेधशाळेने दिला आहे, त्यासाठी येलो अलर्ट जारी केले आहे.









