खानापूर प्रतिनिधी : गर्लगुंजीत ढगफुटी सदृश्य पाऊस सोमवारी सकाळी ११ वाजता गर्लगुंजी परिसरात गडगटासह दोन तास जोरदर ढगफुटी सदृश्य पाऊस झाला, यामुळे गर्लगुंजी येथील अनेक घरात पाणी शिरले असून, गटारीही तुडुंब भरल्याने रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. त्यामुळे या परिसरातील अनेक घरात पाणी गेल्याने लोकांची मोठी तारांबळ उडाली आहे. तसेच शेतांचेही नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. यावेळी बोलताना सदानंद पाटील म्हणाले ग्रामपंचायतीच्या नियोजना अभावी गर्लगुंजीतील घरामध्ये पाणी भरले आहे. गेल्या दहा वर्षापासून गटारीं साफ केल्या नसल्यामुळे गटारी तुडुंब भरून पाणी रस्त्यावर आलेले आहे काढलेलीच नाही यामुळे आज झालेल्या ढगफुटी सदृस्य पावसामुळे सकल भागातील घरात पाणी गेल्याने अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे .यासाठी पंचायतीच्या पीडिओ ना धारेवर धरण्यात आले .
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









