दोन दिवसात 8 जणांचा मृत्यू, 46 बेपत्ता
वृत्तसंस्था/ शिमला
हिमाचल प्रदेशात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर पुन्हा एकदा ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले. शुक्रवारी सायंकाळी 6 वाजल्यापासूनच कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे लाहौल स्पितीच्या पिन व्हॅलीमध्ये पूर आला होता. त्यात एक महिला वाहून गेली. सायंकाळी उशिरा पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेतला. यापूर्वी गुऊवारी 5 ठिकाणी ढगफुटीमुळे 7 जणांचा मृत्यू झाला होता. तर 46 जण बेपत्ता आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस आणि होमगार्डचे जवान बेपत्ता लोकांच्या शोधात व्यग्र आहेत. बेपत्ता लोकांचा शोध ड्रोनच्या माध्यमातून सुरू आहे.
हिमाचल प्रदेशमध्ये कुल्लू, मंडी आणि शिमला येथे पावसाने हाहाकार माजवला आहे. येथे आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून अडकलेल्या 11 जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. शिमला येथील इंजिनिअर टास्क फोर्स रस्त्यांची दुऊस्ती करून जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. लष्कर, एनडीआरएफ, आयटीबीपी आणि इतर यंत्रणांचे 400 हून अधिक जवान बचावकार्य करत आहेत.









