सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी पोलीस ठाण्याच्या दाणोली येथील पोलीस चौकीवर वाहतूक शाखेचे पोलीस नेमले जातात. मध्यंतरी मनुष्यबळ नसल्याचे कारण देत सदर चौकी बंद केली होती. तेथे कर्मचारी नेमताना वरिष्ठांसोबत होणारे अर्थपूर्ण व्यवहार व पर्यटकांची होणारी अडवणूक लक्षात घेता ही चौकी कायमस्वरूपी बंदच करावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते जयंत बरेगार यांनी केली आहे. पोलीस दलात जर कर्मचारी कमी असतील तर मग या चौक्या कशासाठी, असा सवाल बरेगार यांनी केला आहे.
Previous Articleमाडखोल डुंगेवाडीत नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रम
Next Article पी. व्ही. सिंधू उपांत्य फेरीत









