वैज्ञानिकांची हादरविणारी भविष्यवाणी
माणसांच्या अस्तित्वावरून अनेक प्रकारच्या भविष्यवाणी केल्या जात असतात. परंतु यातील काही केवळ ज्योतिषाच्या आधारावर नव्हे तर वैज्ञानिक आधारावर केल्या जातात. एक अशीच भविष्यवाणी सध्या चर्चेत असून ती संशोधनानंतर वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. यामुळे युरोपचे लोक चिंतेत येणार असून यामागील कारण जगभरासाठी अलार्मिंग आहे.
लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीनकडून करण्यात आलेल्या नव्या संशोधनात 2015-2099 दरम्यान काही असे घडेल की युरोपमध्ये 58 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू होईल असे म्हटले गेले आहे. यामागील कारण आम्हा सर्वांसाठी इशाराच आहे.
2015-2099 दरम्यान युरोपमध्ये एकूण 58 लाख लोकांचा मृत्यू होईल. या संशोधनात केवळ हवामान बदलामुळे होणाऱ्या मृत्यूंना सामील करण्यात आले आहे. उष्णतेमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षा अधिक असेल असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे. तर बार्सिलोनामध्ये उष्णतेमुळे सर्वाधिक मृत्यु होतील,त र रोम, नेपल्स आणि माद्रिद यांचा क्रमाक यानंतर लागेल. संशोधनाचे मुख्य लेखक डॉ. पीयरे मस्सेलोट यांनी अहवालाचा निष्कर्ष हवामान बदल आणि तापमवाढीवरून त्वरित उपाय करण्यावर जोर देत असल्याचे म्हटले आहे.
खासकरून भूमध्य समुद्रीय भागांमध्ये परिणाम अधिक भयानक असतील. वेळीच उपाययोजना सुरू न केल्या तर हवामान बदल टाळत लाखो लोकांचा जीव वाचविला जाऊ शकतो. या अध्ययनात युरोपच्या एकूण 854 शहरांना सामील करण्यात आले होते, ज्यात भविष्यात उष्णतेमुळे होणाऱ्या जीवितहानीचा अनुमान व्यक्त करण्यात आला होता. जर याकडे लक्ष दिले गेले नाही तर 58,25,746 लोक स्वत:चा जीव गमावतील. हा अहवाल केवळ युरोपच नव्हे तर पूर्ण जगासाठी इशारा देणारा आहे.









