मनपाला सरकारकडून आदेश
► प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 155 व्या जयंतीनिमित्त 2 ऑक्टोबर रोजी सरकारी कार्यालय परिसर, तसेच शाळा-महाविद्यालयांमध्ये स्वच्छता आंदोलन राबविण्याबाबत महानगरपालिकेला आदेश बजावण्यात आला आहे. राज्य सरकारने हा आदेश बजावला असून, त्या दिवशी सर्वत्र स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास आरोग्याच्या समस्या दूर होतात. महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्यावेळी स्वच्छता आंदोलन हाती घेतले होते. त्यावेळी संपूर्ण देशामध्ये हे आंदोलन यशस्वी झाले होते. आताही त्याचप्रकारे यशस्वी करायचे असून महानगरपालिकेने आपल्या परिसरात हे आंदोलन राबवावे असे या आदेशात म्हटले आहे.









