प्रतिनिधी/ बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन पुढील आठवड्यापासून बेळगावमध्ये होणार असल्याने महापालिकेकडून जय्यत तयारी सुरू आहे. यामुळे महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी रात्रंदिवस काम करत आहेत. रस्त्याचे सुशोभिकरण करण्यासोबतच दुभाजकांची स्वच्छता करण्याचे काम मनपा कर्मचाऱ्यांकडे असल्याने कर्मचारी रात्रंदिवस या कामांमध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहे.
9 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ होत आहे. या पार्श्वभूमीवर शहराची स्वच्छता केली जात आहे. रस्ते, तसेच दुभाजक स्वच्छ करून रंगकाम केले जात आहे. त्याचबरोबर उद्याने, पार्क यांचीही स्वच्छता केली जात आहे. त्यामुळे कर्मचारी या कामामध्ये व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत. सुटी दिवशीही काम पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांची धडपड सुरू आहे.









