बेळगाव : प्रभाग क्रमांक 29 मध्ये येणाऱ्या टिळकवाडी येथील साई मंदिराच्या आवारात पावसामुळे निसरट निर्माण झाली होती. त्यामुळे मंदिरात दर्शनासाठी येणारे भाविक पाय घसरून पडण्याच्या घटना वाढल्या होत्या. याबाबत नगरसेवक नितीन जाधव यांच्याकडे समस्या मांडण्यात आल्याने त्यांनी तातडीने महापालिकेला स्प्रे मशीनच्या साहाय्याने मंदिर परिसर स्वच्छ करण्याची सूचना केली. त्यानुसार मंगळवारी महापालिकेकडून मंदिर आवारात स्वच्छता करण्यात आल्याने भक्त व नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे.
साई मंदिराला येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. मात्र पावसामुळे पेव्हर्सवर निसरट निर्माण झाल्याने मंदिरात येणारे भाविक पाय घसरून पडण्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे ही समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी केली जात होती. त्यानुसार स्थानिक नगरसेवक नितीन जाधव यांनी महापालिकेकडे याबाबत पाठपुरावा चालविला होता. त्यानुसार मंगळवारी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्प्रे मशीनच्या साहाय्याने पेव्हर्सवर पसरलेले शेवाळ पाणी ओतून धुवून काढले. महापालिकेने दाखविलेल्या या तत्परतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.









