वार्ताहर /कणकुंबी
केंद्र सरकारच्या देशव्यापी स्वच्छता मोहिमेच्या आवाहनानुसार सर्वत्र एक तारीख एक तास श्र्रमदान या उपक्रमांतर्गत श्र्रमदान मोहीम राबविण्यात आली. तोराळी येथील सीआरपीएफ पॅम्प म्हणजे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रामार्फत हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू माऊती मलप्रभा तीर्थक्षेत्रावर स्वच्छता सेवा अभियान राबविण्यात आले. स्वच्छता श्र्रमदान अभियानामध्ये सीआरपीएफ पॅम्पमधील सुमारे दोनशे जवान सहभागी झाले होते. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे भारतातील दोन नंबरचे प्रशिक्षण केंद्र म्हणून तोराळी सीआरपीएफ पॅम्पचा उल्लेख केला जातो. पॅम्पचे डीआयजी रविंद्र एम. एल. व कमांडर राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली असिस्टंट कमांडर नरेशकुमार हे आपल्या दोनशे जवानांसह सहभागी झाले होते.
देवस्थानवरील सर्व परिसर, मलप्रभा नदीघाट व आजुबाजुचा सर्व परिसर सीआरपीएफच्या जवानांनी स्वच्छता अभियान मोहिमेंतर्गत स्वच्छ केला. यावेळी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण कसार्लेकर, उपाध्यक्ष नानू गावडे, माजी उपाध्यक्ष सखाराम धुरी, सेव्रेटरी संतोष कदम, सदस्य गणपती सावंत, कार्याध्यक्ष नेताजी घाडी, सदस्य काळू नाईक व हब्बनहट्टी गावातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सीआरपीएफ पॅम्पतर्फे देवस्थानवर वेळोवेळी स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येते. परंतु केंद्र सरकारच्या देशव्यापी स्वच्छता मोहिमेच्या आव्हानानुसार पॅम्पचे अधिकारी व देवस्थान कमिटीच्यावतीने स्वच्छता सेवा अभियानातून श्र्रमदान करण्यात आले. यावेळी देवस्थान कमिटीच्यावतीने सहाय्यक कमांडर नरेश कुमार यांचा सत्कार करून सर्व जवानांचे अभिनंदन करण्यात आले.









