Cleanliness campaign through BJP on Malvan coast
आगामी शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून भाजप पदाधिकारी, मालवण शहर भाजपा युवा मोर्चा व शिवप्रेमींच्या माध्यमातून शुक्रवार मोरयाचा धोंडा ते राजकोट या किनारपट्टी भागात स्वच्छता मोहिम राबवत किनारपट्टी स्वच्छ करण्यात आली. अशी माहिती युवा मोर्चा मालवण शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांनी दिली आहे.
शुक्रवारी सकाळी या मोहिमेचा शुभारंभ झाला. या स्वच्छता मोहिमेत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, खरेदी विक्री संघ संचालक आबा हडकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, उत्तम पेडणेकर, मोहन वराडकर, भाजप महिला मोर्चा मालवण अध्यक्ष पुजा करलकर, शहर अध्यक्ष अन्वेषा आचरेकर, शर्वरी पाटकर, पुजा सरकारे, युवमोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, सरचिटणीस निषय पालेकर, राकेश सावंत, गौरव लुडबे, जलेंद्र करंगुटकर, अनिकेत मयेकर, अभय कदम, कमलेश कोचारेकर, विद्या मेस्त्री, कैलास रेडकर यासह शिवप्रेमी उपस्थित होते.
सौरभ ताम्हणकर यांच्या माध्यमातून गेले काही महिने किनारा स्वच्छता मोहीम सातत्याने राबवली जाते. मालवणात आलेले पर्यटक ज्या किनाऱ्यावर उभे राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा अमूल्य ठेवा किल्ले सिंधुदुर्ग पाहतात. तो किनारा भाग प्राधान्याने स्वच्छ असलाच पाहिजे. या प्रमुख हेतूने सातत्याने स्वच्छता मोहीम राबवण्याचा प्रयत्न असल्याचे सौरभ ताम्हणकर यांनी यावेळी सांगितले.
मालवण | प्रतिनिधी









