आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य
परुळे/प्रतिनिधी
मेढा – निवती ग्रामपंचायतीच्या वतीने आंतरराष्ट्रीय स्वच्छता दिनाचे औचित्य साधत निवती समुद्र किनारपट्टीवर स्वच्छता अभियान राबवत किनारपट्टीची स्वच्छता करण्यात आली.या स्वच्छता अभियानात मेढा निवती येथील प्रताप पंडीत प्राथमिक शाळेतील शिक्षक व विद्यार्थी सहभागी होत किनारपट्टी स्वच्छता अभियानात सहभागी होत स्वच्छता केली.त्याचप्रमाणे या भागातील अंगणवाडी देखील या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते.या स्वच्छता अभियान वेळी मेढा निवती ग्रामपंचायत सरपंच अवधूत रेगे, उपसरपंच प्रज्योत मेतर,जयेश राऊळ विस्तार अधिकारी, सदस्य तृप्ती कांबळी, ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी शरद शिंदे,सिआपी मिनल केळूसकर,प्रिया कांदळगावकर, वृंदा भगत, श्रद्धा वायंगणकर आशा सेविका श्रीरामवाडी, संजना पाटकर अंगणवाडी सेविका आडवेळ,रुपा रावले अंगणवाडी सेविका मेढा, ऋतुजा म्हैसकर मुख्याध्यापिका मुख्याध्यापिका, गणेशसिंह चौहान शिक्षक प्रताप पंडीत शाळा, गोपाळ फुळसुंदर, विकास आडे शिक्षक, प्रभाकर रेवाळे मुख्याध्यापक श्रीरामवाडी शाळा, प्रियांका घाटकर, नारायण कोचरेकर, यतिन आरोलकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी किनार पट्टीवरील स्वच्छ केलेला कचरा एकत्र करून प्लास्टिक व इतर कचरा विभाजन करण्यात आला.या स्वच्छता अभियानावेळी स्वच्छते विषयी मार्गदर्शन मार्गदर्शन करण्यात आले.









