राष्ट्रीय वन हुतात्मा दिनाच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग
बेळगाव : शासनातर्फे 11 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय वन हुतात्मा दिन पाळला जातो. या दिवशी वनखात्यामार्फत राष्ट्रीय वन हुतात्मा दिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर वनखात्याच्या हुतात्मा स्मारक परिसराची स्वच्छता केली. वन कर्मचाऱ्यांनी परिसरातील झाडे-झुडपे गवत काढून परिसर मोकळा केला. वनक्षेत्रेही मानवाच्या दैनंदिन आयुष्याशी जोडली गेली आहेत. अशा वनांचे संरक्षण करताना काही वनकर्मचारी हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव आणि स्मरण होण्यासाठी 11 सप्टेंबर हा वनहुतात्मा दिन म्हणून पाळला जातो. या पार्श्वभूमीवर वनखात्याच्या कार्यालयातील हुतात्मा स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी आरएफओ पुरुषोत्तम रावजी, वनक्षेत्रपाल विनय गौडर यासह कर्मचारी उपस्थित होते.









