बेनकनहळ्ळी ग्रामपंचायत पिडीओना निवेदन
बेळगाव : मागील अनेक वर्षांपासून लक्ष्मीटेक ते बेनकनहळ्ळी दरम्यानच्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेजारी असलेल्या नाल्यापर्यंत कचरा आणि सांडपाणी साचून आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होवू लागली आहे. नाल्याची स्वच्छता करून रस्ता सुरळीत करावा, अशी मागणी बेनकनहळ्ळी ग्राम पंचायतीचे पिडीओ सुजाता बटकुर्की यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबतचे निवेदन पिडीओंकडे सुपूर्द करण्यात आले आहे. लक्ष्मीटेक रस्त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने शेजारी असलेल्या रहिवाशांना कचरा आणि सांडपाण्याचा सामना करावा लागत आहे. याबाबत तक्रार करुन देखील संबंधित ग्रा.पं.चे दुर्लक्ष झाले आहे. या रस्त्याशेजारील कचऱ्याची उचल करून स्वच्छता करावी, अशी मागणी करण्यात आली. बिजगर्णी ग्रा. पं. अध्यक्ष मनोहर बेळगावकर, अशोक कांबळे, नारायण झंगरुचे व नागरिक उपस्थित होते.









