बेळगाव : पी. बी. रोडवरील पॅटसनच्या मागील बाजूस असलेल्या टीचर्स कॉलनीमध्ये तलाव आहे. त्या तलावामध्ये काहीजण अतिक्रमण करून कचरा व माती टाकत आहेत. त्यामुळे त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचबरोबर झाडे-झुडुपे वाढली असून पाणीदेखील साचून आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठी समस्या भेडसावत आहे. तेव्हा सदर तलावाची सफाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. टीचर्स कॉलनीमध्ये नेहमीच विविध समस्या भेडसावत आहेत. चांगली रस्ते नाहीत, गटारी नसल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरत आहे. त्यातच या परिसरात असलेल्या तलावामध्ये अनेकांनी माती तसेच कचरा टाकत आहे. त्यामुळे याठिकाणी डासांचा प्रादूर्भाव वाढला असून त्या जागेची महापालिकेने साफसफाई करावी. या तलावाची स्वच्छता करून जर सौंदर्यीकरण केले तर निश्चितच त्याचा फायदा साऱ्यांना होणार आहे. तेव्हा महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन तलावाची सफाई करून सर्वांसाठी उपलब्ध करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.
Previous Articleशिवशक्तीनगरातील गटारीच्या सफाईत अपयश
Next Article पर्यटन स्थळांवर सुविधांचा अभाव
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









