संगीत कलाकार संघाच्या बैठकीत गायकांना मिळाली उत्तम साथ
प्रतिनिधी/ बेळगाव
संगीत कलाकार संघाच्या जून महिन्याच्या बैठकीत युवा गायिका पूर्वी राजपुरोहित आणि ज्येष्ठ गायिका उषा रानडे यांच्या शास्त्राrय गायनाचा कार्यक्रम टिळकवाडी येथील वरेरकर नाट्या संघाच्या सभागृहात शनिवार दि. 21 रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी पूर्वी राजपुरोहित यांनी शुद्ध कल्याण रागामध्ये विलंबित आणि द्रुत ख्याल पारंपरिक पद्धतीने सादर केला. त्यानंतर मीरा भजन आणि एक रंगगीत गाऊन त्यांनी आपल्या कार्यक्रमाची सांगता केली. त्यांना मुकुंद गोरे यांनी हार्मोनियमवर आणि जितेंद्र साबण्णावर यांनी तबल्यावर संगत केली.
मध्यंतरानंतर उषा रानडे यांनी राग पुरीया धनश्रीमध्ये विलंबित आणि द्रुत ख्याल सादर केला. त्यानंतर मारुबिहाग रागामध्ये छोटा ख्याल आणि नंतर एक भजन गाऊन कार्यक्रम संपन्न केला. त्यांच्याबरोबर तबल्यावर नितीन सुतार आणि हार्मोनियमवर सुयोग दातार यांनी सुंदर साथ देऊन कार्यक्रमात रंग भरला. तानपुरा साथ रुजुला नातू यांनी दिली. सर्वांना पुष्प देऊन जगन्नाथ धर्माधिकारी यांनी सन्मानित केले.
संघाचे अध्यक्ष नंदन हेर्लेकर यांनी सर्वांचे स्वागत करून विशेष उपस्थित साहित्यिक एल. एस. शास्त्राr यांचा व कलाकारांचा पुष्प देऊन सन्मान केला. सेक्रेटरी प्रभाकर शहापूरकर यांनी प्रास्ताविक आणि आभार व्यक्त करून कलाकारांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाला रसिकांची चांगली उपस्थिती होती.









