दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी
इचलकरंजी: अश्लिल वर्तनाचा जाब विचारण्यावरून येथे दोन गटात झालेल्या हाणामारीत सहा जण जखमी आहे. ही घटना मंगळवारी रात्री मोनेमाळ परिसरात घडली दोन्ही गटांनी एकमेकाविरोधात शिवाजीनगर पोलिसात फिर्यादी दाखल केल्या आहेत.
पोलिसांनी दोन्हीकडील १३ जणांवर गुन्हे दाखत केले आहेत. याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, मंगळवारी रात्री महिलेबाबत शेजारी राहणाऱ्याने अश्लिल वर्तन केल्याचा आरोप करण्यात आला.
या प्रकाराबाबत तिच्या कुटुंबियांनी संबंधिताला जाब विचारता, वाद तीव्र झाला आणि गोंधळ उडाला. त्यानंतर एका गटातील सहा जणांनी कोयता, दगड फरशी आणि काठ्या घेऊन हल्ला चढवला. यात दोघे गंभीर जखमी झाले असून चार जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.
दरम्यान, दुसऱ्या गटातील महिलेनेही पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तिच्या फिर्यादीत, पहिल्या गटातील सात जणांनी घरात पुसून स्वतः सह भावाला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या हल्ल्यात दोघे जखमी झाल्याचे नमूद केले आहे.








