प्रतिनिधी, रत्नागिरी
Ratnagiri Crime News : शहरातील घुडे वठार येथे रविवारी रात्री दोन गटात जोरदार सशस्त्र हाणामारी झाल़ी यावेळी दोन्ही बाजूकडून एकमेकांवर धारधार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. वार होताच रक्ताच्या चिरकांड्या घटनास्थळी उडाल्या. यातील जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र जखमींचा समाचार घेण्यासाठी आलेल्या दुसऱ्या गटाने जिल्हा शासकीय रूग्णालयातच फ्रि स्टाईल हाणामारी केल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती.
घडल्या प्रकाराची गंभीर दखल घेत शहर पोलिसांकडून मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, दोन गटात झालेल्या या हाणामारीच्या घटनेने रत्नागिरीत पुन्हा एकदा गँगवॉर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पैशाच्या व्यवहारातून हा वाद झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे पैसे न दिल्याच्या रागातून दोन्ही गट आमने-सामने आले होते. यावेळी वाद विकोपाला गेल्याने धारधार शस्त्रांनी एकमेकांवर सपासप वार करण्यात आले.तर जखमींना जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करताच अन्य गटाने मारहाणीचे उपटे काढण्यासाठी जिल्हा रूग्णालयाकडे धडक मारली. यावेळी वैद्यकीय अधिकारी, नर्स व इतर सर्व रूग्णासमोरच हंगामा घालण्यास सुरूवात केली. तसेच दोन्ही जखमींना मारहाण करण्यास सुरूवात केल़ी यावेळी जिल्हा रूग्णालयातील खुर्च्या स्टुल उचलून मारहाण करण्यास सुरूवात केली. अशी माहिती रूग्णालयातील सुत्रांकडून प्राप्त झाली.
दरम्यान, घडल्या प्रकाराने दोन गटातील लोकांची धरपकड करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. जखमींचा जबाब घेण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे. घडल्या पोलिसांकडून माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे या प्रकाराबाबत नेमके गौडबंगाल काय असा पश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे.
गुंडांना राहिले नाही कायद्याचे भय
रत्नागिरी शहर व लगतच्या परिसरात मागील काही महिन्यांपासून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मागील वर्षी खूनाची मालिका रत्नागिरी शहर परिसरात पहावयास मिळाली तर महिलांची असुरक्षितता,अंमली पदार्थांची विकी असे सातत्याने पकार उघडकीस येत आहेत. आता टोळी युद्ध देखील सुरू झाल्याने रत्नागिरी शहरात गुंडांना कायद्याचे भय राहिले नसल्याची प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.









