दोघा जखमींवर रुग्णालयात उपचार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीतील तिहार कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. कारागृहातील फोन रूममध्ये काही कैद्यांनी बदला घेण्याच्या उद्देशाने दोन कैद्यांवर हल्ला करून त्यांना जखमी केले. दोन्ही जखमी कैद्यांना डीडीयू ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवली आणि लवेश अशी जखमी कैद्यांची नावे आहेत. या दोघांवर आंबेडकरनगर परिसरात खुनाचा गुन्हा दाखल होता. लोकेश नावाच्या कैद्याने या दोघांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. लोकेशच्या भावाच्या हत्येच्या आरोपाखाली दोन्ही जखमी कैदी कारागृहात होते. या कटात हिमांश आणि अभिषेकने लोकेशला साथ दिली होती.









