हॉटेल मालक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : पर्यटन विभागाच्या परवानगीने चालणाऱ्या सीएल-07 हॉटेलच्या शुल्क वाढीसंबंधी 15 मे 2025 रोजी केलेल्या आदेशामुळे हॉटेल चालकांवर अन्याय झाला असून या आदेशाचा पुनर्विचार करण्याची मागणी हॉटेल चालकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यासंबंधी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले आहे. वेगवेगळ्या राज्यांमधील करप्रणाली व नव्या आदेशामुळे कर्नाटकात सीएल-07 साठी भरावे लागणारे कर यात मोठी तफावत आहे. त्यामुळे हॉटेल चालकांवर आर्थिक भार पडत आहे. अशा परिस्थितीत व्यवसाय करणे कठीण जात आहे. म्हणून त्या आदेशाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. रेवणसिद्धय्या कलबुर्गी, उमेश बाळी, राजशेखर कलाल, शिवराज बसगुंडी, रमेश कळसन्नावर आदी उपस्थित होते.









