सावंतवाडी व कणकवली उपजिल्हा रुग्णालयासाठी सिटीस्कॅन मशिन मंजुर
जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय व कणकवली उपजिल्हा रुग्णालयासाठी सिटीस्कॅन मशिनला शासनाची मंजुरी मिळाली आहे . त्यानुसार, मशीन बसविण्यासाठी युद्धपातळीवर रुग्णालयाच्या इमारतीमध्ये अंतर्गत भागात कामाला सुरुवात करण्यात आली आहे. सावंतवाडी व कणकवली रुग्णालयासाठी सिटीस्कॅन मशीन व जिल्हा रुग्णालय ओरोस येथे एम . आर. आय मशिनरी उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी सावंतवाडी चे सामाजिक कार्यकर्ते तथा जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे करून फोनवरून चर्चा करून लक्ष वेधले होते. उपजिल्हा रुग्णालयासाठी सिटीस्कॅन मशिनरीला मंजुरी मिळाल्याने गोरगरीब व सर्वसामान्य अपघातग्रस्त रुग्णांना सुविधा मिळणार आहे. तसेच गंभीर अशा रुग्णांना सिटीस्कॅन करण्यासाठी बांबोळी गोवा रुग्णालयात जाण्या येण्यासाठी होणाऱ्या त्रास व निर्माण होणारा आर्थिक प्रश्न सुटणार आहे. पालकमंत्री चव्हाण यांनी रुग्णांना चांगली सेवा मिळावी यासाठी आपण केलेल्या मागणीच्या निवेदनाची तात्काळ दखल घेतल्याने मसूरकर यांनी आभार मानलेआहेत . शासनाने मंजुरी दिल्याने कंपनीमार्फत सावंतवाडी व कणकवली उपजिल्हा रुग्णालयात सिटीस्कॅन मशिनरी बसवण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे.









