बेळगाव :
हेस्कॉमकडून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या जलवाहिनीवर भार पडून अंकलगीनजीक नादुरुस्त झाली. त्यामुळे मागील दोन दिवस शहराला पाणीपुरवठा करण्यात व्यत्यय निर्माण झाला. जलवाहिनी दुऊस्तीचे काम पूर्ण झाले असून शहराला पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येत असल्याचे पाणीपुरवठा मंडळाने एका पत्रकाद्वारे कळविले आहे.









