मागणीच्या प्रमाणात वीजपुरवठा नसल्याने समस्या
बेळगाव : मागणीपेक्षा वीजपुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने सोमवारी रात्री बेळगाव शहरासह संपूर्ण तालुका अंधारात होता. तब्बल दोन ते तीन तास वीजपुरवठा ठप्प असल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात होता. मागील आठ दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असताना सोमवारी पूर्णपणे वीज ठप्प झाल्याने हेस्कॉमचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला.
सोमवारी सायंकाळी सात वाजल्यापासून बेळगाव शहरासह तालुक्मयातील वीजपुरवठा काढण्यात आला. ज्या प्रमाणात विजेची मागणी आहे, त्या प्रमाणात वीज उपलब्ध नसल्याने पुरवठा बंद करण्यात आला. बेळगाव शहरातील मध्यवर्ती भागात तसेच महत्त्वाची हॉस्पिटल व इतर ठिकाणी वीजपुरवठा सुरू होता. शहरात केवळ 50 टक्के वीजपुरवठा सुरू असल्याने उपनगरांमध्ये मात्र अंधार पसरला होता. अचानक वीज गायब झाल्यामुळे नागरिकांनी इन्व्हर्टर व मेणबत्तीच्या साहाय्याने रात्र काढली.
विद्यार्थ्यांचे होताहेत हाल
पावसाची संततधार सुरू असल्याने ठिकठिकाणी वीजखांब कोसळून बऱयाचशा भागात विजेचा लपंडाव सुरू होता. दररोजच्या विजेच्या समस्येने विद्यार्थ्यांसह व्यापारी, कारखानदार मेटाकुटीला आले आहेत. सध्या काही शाळांमध्ये परीक्षा सुरू असून विजेविना अभ्यास कसा करायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे.
मागणी वाढल्यामुळे वीजपुरवठा बंद
बेळगाव शहर व तालुक्मयाला वितरित होणाऱया वीज पुरवठय़ापेक्षा मागणी अधिक असल्यामुळे सोमवारी सायंकाळी वीजपुरवठा ठप्प झाला. शहरात 50 टक्के वीजपुरवठा सुरू होता. विजेची मागणी वाढल्यामुळे उपनगर व तालुक्मयातील वीजपुरवठा बंद करावा लागल्याची माहिती त्यांनी दिली.
– एम टी. अप्पांनावर (कार्यकारी अभियंते)