सावंतवाडी / प्रतिनिधी
Citizens should use water sparingly in case of El Nino; Appeal of Principal Jayant Javadekar
एल निनो (El-Nino) च्या प्रभावामुळे यंदा राज्यात पावसावर परिणाम होण्याची शक्यता आहे .त्यामुळे पाणीटंचाईची शक्यताही निर्माण होणार आहे. पाणीटंचाई निवारण करण्यासाठी नागरिकांनी पाणी जपून वापरावे तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी नागरिकांना केले आहे . नळ कनेक्शनवर गळती असल्यास ती त्वरित दुरुस्त करावी या कालावधीमध्ये शहरात काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे .त्यामुळे नागरिकांनी पालिकेला सहकार्य करावे कोणीही नळधारकांनी कनेक्शन डायरेक्ट पाईपलाईनला पंप जोडून पाणी घेऊ नये .यासंदर्भात पाहणी करण्यासाठी नगर परिषदेने फिरते पथक नेमलेले आहे .हे पथक नळ कनेक्शन डायरेक्ट पाईपलाईनला पंप जोडल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.









