कोल्हापूर :
इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावामध्ये यात्रेनिमित्त गावांमध्ये महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाप्रसादातून सुमारे 300 ते 350 नागरिकांना विषबाधा झाली आहे तर या सर्वांवर इंदिरा गांधी रुग्णालय व जिल्ह्यातील इतर रुग्णालयांमध्ये उपचार सध्या सुरू आहेत








