आमदार असिफ सेठ यांना दिले निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
गांधीनगर येथील रेल्वेगेट परिसरात उड्डाणपूल करण्याचा विचार नैर्त्रुत्य रेल्वेने केला आहे. परंतु या उड्डाणपुलामुळे परिसरात पाणी थांबण्याची शक्यता आहे. तसेच याचा परिणाम व्यापाऱ्यांवर होणार असल्याने न्यू गांधीनगर व अमननगर येथील नागरिकांनी उ•ाणपूल करण्यास विरोध दर्शविला आहे. शनिवारी नागरिकांनी बेळगाव उत्तरचे आमदार असिफ सेठ यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली मागणी मांडली.
नैर्त्रुत्य रेल्वेकडून शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उ•ाणपुलांचे बांधकाम करण्यात येत आहे. कपिलेश्वर उड्डाणपूल, धारवाड रोड उड्डाणपूल, तिसरे रेल्वेगेट उड्डाणपूल झाल्यानंतर आता अनगोळ येथील चौथ्या रेल्वेगेट उ•ाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. तानाजी गल्ली येथील नागरिकांनी विरोध दर्शविल्यामुळे तेथील उ•ाणपूल रद्द करून रस्ता कायमस्वरुपी बंद करण्यात आला.
आता गांधीनगर येथेही उ•ाणपूल करण्याचा विचार सुरू आहे. परंतु सद्यस्थितीला 44 फूट रुंद रस्ता असून त्यापैकी 28 ते 30 फूट जागेत उ•ाणपूल होणार आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंना केवळ 7 फूट जागा उपलब्ध होईल. उभारल्या जाणाऱ्या भिंतीमुळे न्यू गांधीनगर व अमननगर येथील व्यापार ठप्प होण्याची भीती विक्रेत्यांनी व्यक्त केली. तसेच सध्या पावसाचे पाणी साचत असल्याने उ•ाणपुलामुळे पाणी साचण्याचे प्रमाण अधिकच वाढणार आहे. त्यामुळे उ•ाणपूल रद्द करण्याची मागणी नागरिकांनी आमदारांकडे केली.
आमदार असिफ सेठ यांनी नागरिकांची मागणी ऐकून घेत यासंदर्भात पालकमंत्री सतीश जारकीहोळी व जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेऊ, असे आश्वासन दिले. नगरसेवक अजिम पटवेगार यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.









