पिरनवाडी येथे मोफत शिबिर, शिवसेना कार्यकत्यर्चां उपक्रम
वार्ताहर/ किणये
हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिरनवाडी गावातील नागरिकांची शुक्रवार व शनिवारी असे दोन दिवस मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. हा उपक्रम या भागातील शिवसेना कार्यकर्त्यांनी राबविला आहे.
शिवसेना बेळगाव मध्यवर्ती कार्यालय, शिवसेना बेळगाव तालुका व लोककल्याण आरोग्य केंद्र मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
शुक्रवारी राम मंदिर पिरनवाडी येथे शिबिराचे उद्घाटन शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर व शिवसेना तालुकाप्रमुख सचिन गोरले यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित डॉक्टरांचे पुष्पगुच्छ देऊन पिराजी शिंदे, प्रवीण तेजम व बाळू मुचंडीकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या भागातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
या शिबिरात नागरिकांच्या विविध आरोग्याच्या तपासणी मोफत करण्यात आल्या. त्यानंतर औषधांचे वाटपही करण्यात आले.
याप्रसंगी उपस्थित डॉक्टरांनी नागरिकांना आरोग्य संबंधित घ्यावयाची काळजी तसेच आहार कोणता आणि कसा घ्यावा, विविध आजारांची लक्षणे कोणती आणि त्यावरती उपचार कशा पद्धतीने घ्यावा, याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
शनिवारी सकाळी पिरनवाडी येथील जनता प्लॉट भागात या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. अलीकडे माणसाला छोटे-मोठे आजाराचे प्रमाण वाढू लागले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या आरोग्याची मोफत तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आले आहेत. त्यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून या शिबिराचे आम्ही आयोजन केले, असे सचिन गोरले यांनी बोलताना सांगितले. या प्रसंगी किरण यळूरकर, गणेश शिंदे आदींसह शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.









