शहरीकरण आणि हवामान बदलाच्या या काळात शहरं आता केवळ विकास आणि आधुनिकतेची प्रतीकं राहिली नाहीत, तर ती एका नवे पर्यावरणीय आव्हान ‘हीट आयलँड’चे केंद्र ठरली आहेत. यात शहरी क्षेत्रांचे तापमान आसपासच्या ग्रामीण भागांच्या तुलनेत अधिक होते. हा प्रकार मानवी आरोग्यासाठी घातक आहे. एकीकडे हे हिवाळ्यात थंडीमुळे होणाऱ्या मृत्यूंना प्रभावित करू शकते तर दुसरीकडे उन्हाळ्यात जीवघेण्या उष्णतेच्या प्रभावाला आणखी घातक करत असते.
सायंटिफिक जर्नल नेचर क्लायमेट चेंजमध्ये प्रकाशित एका संशोधनानुसार 3 हजारांहून अधिक शहरांमध्ये मृत्यूदर आणि तापमानादरम्यान संबंधांचे विश्लेषण करण्यात आले. या संशोधनात रिमोट सेंसिंग डाटा, हवामान आणि सामाजिक-आर्थिक आकडेवारीची मदत घेण्यात आली. शहरी हीट आयलँडमध्ये थंडीमुळ होणाऱ्या मृत्यूंमध्ये घसरण दिसून आली, तर उष्णतेशी संबंधित मृत्यूंमध्ये झालेली वाढ सरासरी 4.4 पट अधिक होती, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. ही परिघटना (फेनोमेना) समग्र स्वरुपात आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, खासकरून जेव्हा हिवाळ्याच्या तापमानात अत्याधिक वृद्धी होते, असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे.
बहुतांश शहरांमध्ये रात्रीच्या वेळी पडणाऱ्या थंडीचे प्रमाण कमी झाले आहे, पूर्वी उष्णतेपासून दिलासा देणारा हा एक स्वाभाविक उपाय असायचा. हीट वेव आणि अत्याधिक उष्णतेच्या स्थितींमध्ये जनस्वास्थाच्या रक्षणासाठी एक ठोस आपत्कालीन कार्ययोजना तयार केली जावी, असे अहवालात म्हटले गेले आहे. ही कार्ययोजना तत्काळ दिलासा प्रदान करण्यासह दीर्घकालीन रणनीतिंचा आधार ठरू शकते. या कार्ययोजनेकरता तत्काळ पावले उचलण्याची गरज आहे.
ठोस उपाय आवश्यक
शहरी तापमानाला नियंत्रित करण्यासाठी विविध रणनीति अवलंबिण्यात येत असून यात वृक्षारोपण, इमारतींच्या परावर्तक क्षमतेत (अल्बेडो) वृद्धी आणि शीतलन सामग्रीचा वापर सामील आहे. हे उपाय उष्णतेच्या प्रभावाला मर्यादित करण्यास सहाय्यभूत ठरू शकतात. या उपायांना हवामान आधारित दृष्टीकोनासह लागू करण्यात यावे, जेणेकरून ते एका हवामानात दिलासा देण्यासह दुसऱ्या हवामानात जोखीम वाढविणारे ठरू नयेत अशी सूचना संशोधकांनी केली.









