सीटी समूहाच्या एचआर प्रमुख साराह वेचर यांचे संकेत
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतातील बँकिंग सेवा देणारी आघाडीची अमेरिकन बँकिंग समूह सिटी ग्रुपने भारतात 5,000 नोकऱ्या उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले आहे. एका मुलाखतीत, सीटी समूहाच्या एचआर प्रमुख साराह वेचर यांनी रोजगाराच्या संधींची माहिती दिली आहे.
सीटीच्या मानव संसाधन विभाग प्रमुख सारा वेचर भारताच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुलाखतीत सांगितले की, व्यवसाय वाढीसाठी सिटीला भारतात खूप साऱ्या संधी आहेत आणि आम्ही भारतातील आमच्या सोल्यूशन सेंटर्समध्ये कर्मचारी संख्या वाढवणार आहोत. वेचर म्हणाल्या की देशातील सिटी सोल्यूशन सेंटर्स पुढील दोन वर्षांत किमान 5,000 लोकांना रोजगार देतील. पुढील दोन वर्षांत नियुक्ती अपेक्षित आहे. यानंतर कर्मचाऱ्यांची एकूण संख्या 32,000 पेक्षा जास्त होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
यूएस बँकिंग क्षेत्रातील प्रमुख सीटी नुकतीच भारतातील ग्राहक बँकिंग व्यवसायातून बाहेर पडली आहे. कंपनीने म्हटले आहे की ते तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, विश्लेषण, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याच्या जोखमीसह इतर क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल. म्हणूनच आपल्या युनिट्समध्ये हुशार कर्मचाऱ्यांची संख्या वाढवत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सीटी ग्रुपमध्ये कामाच्या लवचिकतेबद्दल, सारा वेचर म्हणाल्या की कोविडच्या दरम्यान, आम्ही कसे कार्य करायचे हे आम्ही ठरवले आणि आम्ही तीन प्रकारच्या भूमिका घेऊन काम यशस्वीपणे केले.









