नफा वाढीसह 1,222 कोटींवर : 13 रुपयाच्या लाभांशांची घोषणा
वृत्तसंस्था/ मुंबई
सिप्ला कंपनीला आर्थिक वर्ष 2024-25 च्या चौथ्या तिमाहीत जवळपास 1,222 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त झाला आहे. वर्षाच्या आधारे कंपनीचा हा नफा तब्बल 30 टक्क्यांनी वधारला आहे. एका वर्षापूर्वी समान तिमाहीत कंपनीच नफा हा 939 कोटी रुपये होता. जानेवारी ते मार्च या तिमाहीत कंपनीला नफा कमाई 6,589 कोटी रुपये झाली. महसूल कमाई ही साधारपणे 6,082 कोटी रुपये झाली असून हा आकडा वर्षाच्या आधारे 8.48 टक्क्यांनी वाढल्याची नोंद आहे. कंपनीने आपला तिमाही अहवाल सादर करताना प्रति समभाग 13 रुपये लांभाश देण्याची घोषणा केली आहे.










