मुंबई
औषध क्षेत्रातील कंपनी सिप्लाने आपल्या दुसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर केला असून कंपनीने नफ्यामध्ये वर्षाच्या स्तरावर 43 टक्के वाढ नोंदवली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत सप्टेंबरला संपलेल्या कालावधीत 1130 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा कंपनीने प्राप्त केला आहे. कंपनीने याच कालावधीमध्ये 14 टक्के वाढीसह 6678 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. हे जे उत्पन्न कंपनीने मिळवले आहे ते आतापर्यंतच्या तिमाहीतील सर्वाधिक उत्पन्न मानले जात आहे. या बातमीनंतर सिप्लाचे समभाग 4 टक्के इतके शेअर बाजारात वधारले होते.









