वृत्तसंस्था / रोम
इटलीचा जागतिक दर्जाचा टेनिसपटू तसेच माजी टॉपसिडेड जेनिक सिनेरचे पुनरागमन मे महिन्यातील रोम मास्टर्स टेनिस स्पर्धेत होणार आहे. उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्याने सिनेरवर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात आली होती. या बंदीचा कालावधी आता समाप्त झाल्याने सिनेर रोम मास्टर्स स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.
इटलीच्या सिनेरने 2025 च्या टेनिस हंगामात जानेवारीतील पहिली ऑस्ट्रेलियन ग्रॅन्डस्लॅम स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर सिनेरवर उत्तेजक चाचणीनंतर निर्बंध घालण्याचा निर्णय फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आला होता. त्याच्यावर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी बंदी घालण्यात आली होती. त्याच्या बंदी कालावधीची मुदत 4 मे रोजी संपणार आहे. आता 25 मे पासून सुरू होणाऱ्या फ्रेंच ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेसाठी सिनेरने खडतर सरावाला प्रारंभ केला आहे.









