बेळगाव : कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया (सीआयआय)च्या बेळगाव जिल्ह्याचे नूतन चेअरमन म्हणून बेळगाव ऑक्सिजन प्रा. लि. चे कार्यकारी संचालक व्यंकटेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्हा. चेअरमन प्रगती इंजिनिअरचे कार्यकारी संचालक महेश भिरंगी यांची निवड करण्यात आली. व्यंकटेश पाटील हे सीआयआयशी अनेक वर्षे संलग्न आहेत. ते नामवंत उद्योजक असून सांख्या लॅब प्रा. लि.चे व वायव्य लॅब्स या कंपन्यांचे समर्थक आहेत. स्टार्टअप सुरू करण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. महेश भिरंगी हे गेल्या 30 वर्षांपासून प्रगतीचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत. गुणवत्तापूर्ण उत्पादन, व्रिक्री आणि व्यवस्थापन यामध्ये ते तज्ञ आहेत. कौशल्या विकास केंद्र सुरू करण्यासाठी मार्गदर्शक म्हणूनही ते ओळखले जातात.
Previous Articleसीए बेळगाव शाखा चेअरमनपदी राजेंद्र मुंदडा
Next Article लोककल्प फाऊंडेशनतर्फे टी-शर्ट, टॅकसूटचे वितरण
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









