प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा पोलिसांनी चंद्रनाथ अपार्टमेंट येथे असलेल्या भुराराम चौधरी यांच्या नरेश पेन सेंटर दुकानावर छापा घालून त्यांच्याकडील बेकायदेशीर तंबाखू व सिगरेट मिळून दीड लाखांचा माल जप्त केला. या तंबाखूमध्ये विमल तंबाखू, चिनी तंबाखू, तुळशी तंबाखू, आरएमसी मसाला, मानिकचंद तंबाखू तसेच विविध प्रकारचे सिगरेटचे ब्रॅण्ड जप्त करण्यात आले.
निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष परब, विराज कोरगावकर, हवालदार सुशांत नाईक चोपडेकर, शिपाई राजेश कानोळकर, आनंद राठोड, अक्षय पाटील यांनी ही कारवाई केली. उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई झाली.









