प्रतिनिधी / म्हापसा
म्हापसा पोलीस उपविभागीय क्षेत्रात येणाऱ्या म्हापसा, हणजूण, कोलवाळ क्षेत्रात पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकाऱ्यांनी तंबाखू विकणाऱ्या दुकानदार गाळेवजावर छापा घालून सिगरेट व तंबाखू मिळून 40 हजार ऊपयांचा माल जप्त करण्यात आला. ऐन अधिवेशन सुरू असतानाच झालेल्या या कारवाईमुळे याबाबत उलट सुलट चर्चा सुरू आहे.
वेर्ला–काणका पिंटो वाडो येथे छापा घालून श्याम सुदीन जमीर शेख याला ताब्यात घेतले. हा नामोशी गिरी येथे तंबाखू विकत असताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. हणजूण पोलिसांनी हडफडे येथे छापा घालून इंब्राहिम अझीमुल्ला मुळ मध्यप्रदेश याच्याकडून बेकायदेशीररित्या तंबाखू सिगारेट मिळून 40 हजार ऊपयांचा माल जप्त केला. कोलवाळ पोलिसांनी कारवाई करीत अरूण सुरेश कुमार साई कॉलनी माडेल थिवी याच्याकडून 3 हजार ऊपयांचा तंबाखू जप्त केला. राम राज निशाद रा. शिरसई मुळ उत्तर प्रदेश याच्याकडून 1380 ऊपयांचा तंबाखू जप्त केला. म्हापसा पोलिसांनी 1 जानेवारी ते 19 जुलै 2023 या सात महिन्यात 2 लाख 9 हजार ऊपये दंडाच्या स्वऊपात सरकारी तिजोरीत जमा केले. पोलीस अधीक्षक निधीन वाल्सन यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई उपअधीक्षक जिवबा दळवी यांनी आपल्या हद्दीत केली.









