Cigarette Smoking : सिगारेटमुळे कर्करोग होतो.अस प्रत्येक सिगारेटच्या पाॅकेटवर लिहलेलं असतं. ही सूचना फक्त सिगारेट ओढणाऱ्यांसाठी असते. मात्र हा इशारा आजूबाजूला उभ्या असलेल्यांसाठी नसतो. पण तुम्हाला माहित आहे का की सिगारेट ओढणाऱ्यांच्या जवळ राहिल्याने अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागतो.जे तुम्हाला आयुष्यभर सोडत नाहीत. अशा अनेक धक्कादायक बाबी अभ्यासात समोर आल्या आहेत.
द लॅन्सेट फॅमिली ऑफ जर्नल्स इन बायोमेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, सिगारेट ओढल्याने धूर निर्माण होतो.त्यातून बाहेर पडणाऱ्या कणांच्या संपर्कात आलेल्यांना त्वचेच्या आजारांचा सामना करावा लागतो. यामध्ये नागीण,खरुज याशिवाय सोरायसिससारखे गंभीर आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. सोरायसिस हा त्वचेचा गंभीर आजार असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.यामध्ये मानवी शरीरावर डाग तयार होतात.कधी कधी मुरुम होतात आणि ते सतत बाहेर पडत राहतात.अनेक लोकांमध्ये हा आजार आयुष्यभर टिकतो.उपचार करूनही व्यक्ती बरी होत नाही.
अभ्यासात काय सिध्द झाले
अभ्यासातील सहभागींसाठी दोन गट करण्यात आले. एका गटात फक्त धुम्रपान करणाऱ्यांना समाविष्ट करण्यात आले. तर दुसऱ्या गटामध्ये जे धूम्रपान करत नाहीत अशा लोकांना धुम्रपान करणाऱ्यांसोबत समाविष्ट करण्यात आले. यावेळी असे लक्षात आले की, धूम्रपानाच्या धुरातून निघणारे कण हे मानवी शरीरासोबत चिटकून राहिले. जोपर्यंत ते धूत नाही तोपर्यंत ते शरीरावर चिटकून राहिले. जास्तवेळ शरीरावर हे कण चिकटल्यामुळे खाज, खरुज आणि सोरायसिससारखे आजार होण्याची शक्यता वाढल्याचे निदर्शनास आले.
तंबाखूच्या सेवनामुळे दरवर्षी 13 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो
भारतात दरवर्षी 13 लाखांहून अधिक मृत्यू तंबाखूच्या सेवनामुळे होतात. 2018 मध्ये, नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्चने अहवाल दिला की 46 टक्के धूम्रपान करणारे अशिक्षित आहेत आणि 16 टक्के महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.तर 1990 मध्ये जगभरात 99 कोटी लोकांनी धूम्रपान केले. 2019 मध्ये ही संख्या 114 कोटींवर पोहोचली आहे.यामध्ये 15 वर्षाच्या मुलांचा जादा सहभाग आहे. जगातील 15 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे 32·7% पुरुष आणि 6-62% स्त्रिया तंबाखूचा वापर करतात.
Disclaimer: या लेखात नमूद केलेल्या पद्धती केवळ सूचना म्हणून घ्यायच्या आहेत.कोणत्याही उपचार/औषध/आहार आणि सूचनांचे पालन करण्यापूर्वी कृपया डॉक्टरांचा किंवा संबंधित तज्ञाचा सल्ला घ्या.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









