तंबाखूच्या धुरात 7 हजारांहून अधिक रसायनं : 69 कॅन्सरसाठी कारणीभूत
धूम्रपान केवळ धूम्रपान करणाऱ्यांसाठी घातक नव्हे तर त्याच्या आसपास असलेल्या लोकांसाठी देखील गंभीर धोका आहे. नव्या अध्ययनातून पॅसिव्ह स्मोकिंग (सेकंड हँड स्मोक)च्या संपर्कात आल्याने मुलांच्या जीनमध्ये (गुणसूत्र) बदल होऊ शकतात. हे परिवर्तन भविष्यात विविध आजारांच्या धोक्याला वाढवू शकते. बार्सिलोना इन्स्टीट्यूट फॉर ग्लोबल हेल्थच्या वैज्ञानिकांचे अध्ययन प्रतिष्ठित नियतकालिक एनवायरमेंट इंटरनॅशनलमध्ये प्रकाशित झाले आहे.
संशोधकांनुसार डीएनएत जीनच्या हालचालींना नियंत्रित करणारी सर्व परिवर्तनं एपिजीनोम म्हणवून घेतात. पॅसिव्ह स्मोकिंगचा अर्थ व्यक्ती स्वत: धूम्रपान करत नसला तरीही आसपास असलेल्या तंबाखूच्या धूराच्या संपर्कात येणे. आमचा डीएनए शरीरासाठी एक निर्देशपुस्तिकेप्रमाणे कार्य करतो आणि तंबाखूचा धूर या पुस्तिकेच्या सामग्रीला (जीन अनुक्रम) बदलतो, तसेच त्याच्यावर अशा खुणा सोडतो, ज्या या निर्देशांना वाचण्याच्या प्रक्रियेला प्रभावित करतात. अशा खुणांपैकी एकाला डीएनए मिथाइलेशन म्हटले जाते, जे कुठला जीन सक्रिय किंवा निष्क्रीय होईल हे ठरवते.
बंद स्थानांमध्ये सर्वाधिक प्रभाव
भारतासमवेत अनेक देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानावर बंदी घालण्यात आली आहे, परंतु घरांमध्ये मुले अद्याप देखील पॅसिव्ह स्मोकिंगचे शिकार ठरत आहेत. 2004 च्या आकडेवारीनुसार जागतिक स्तरावर जवळपास 40 टक्के मुले पॅसिव्ह स्मोकिंगच्या संपर्कात आली होती. या धूरामुळे फुफ्फुस आणि हृदयरोगाचा धोका वाढू शकतो, तसेच मुलांच्या मेंदूचा विकास आणि प्रतिरक्षण प्रणालीवरही नकारात्मक प्रभाव पडू शकतो. तंबाखूच्या धूरात 7 हजारांहून अधिक रसायनं असतात, ज्यातील 69 रसायनांमध्ये कॅन्सर निर्माण करणारे घटक असतात.
जीनवर गंभीर प्रभाव
गर्भावस्थादरम्यान जर महिला धूम्रपान करत असेल तर हे तिच्या अपत्याला जीनला प्रभावित करू शकते हे वैज्ञानिकांना यापूर्वीच कळले होते. परंतु नवे अध्ययन बालपणी जर कुणी तंबाखूच्या धूराच्या संपर्कात आला असेल तर त्याच्या जीनवर गंभीर प्रभाव पडू शकतो हे दाखवून देते.
अनेक गंभीर आजार शक्य
बालपणी पॅसिव्ह स्मोकिंगच्या संपर्कात आल्याने जीनमध्ये खोल स्तरावर बदल घडून येऊ शकतात. हा प्रभाव दीर्घकालीन असू शकतो आणि पुढील काळात गंभीर आजारांचे कारण ठरू शकतो, असे आयएस ग्लोबलच्या प्रमुख संशोधिका मार्टा कोसिन-टॉमस यांनी या अध्ययनाचा दाखला देत म्हटले आहे.









