दोन दिवसांपासून पथकाकडून तपास : माहिती घेण्याचे काम सुरू
प्रतिनिधी/ बेळगाव
येथील भिमाम्बिका महिला सौहार्द सहकारीमध्ये झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी सीआयडीचे पथक बेळगावात आले असून दोन दिवसांपासून या संस्थेच्या व्यवहारासंबंधी माहिती जमवण्याचे काम अधिकाऱ्यांनी हाती घेतले आहे. सीआयडी आर्थिक गुन्हे तपास विभागाचे पोलीस उपअधीक्षक पुरुषोत्तम यांच्या नेतृत्वाखाली अधिकाऱ्यांचे एक पथक दोन दिवसांपासून बेळगाव परिसरात तळ ठोकून आहे. रिसालदार गल्ली परिसरात त्यांनी शुक्रवारी व शनिवारी दिवसभर माहिती जमवली आहे. स्थानिक पोलिसांशीही संपर्क साधून माहिती जमवली आहे.
संगोळ्ळी रायण्णा सोसायटी पाठोपाठच भिमाम्बिका महिला सौहार्द सहकारीमधील आर्थिक गैरव्यवहारासंबंधीही एफआयआर दाखल झाला होता. संगोळ्ळी रायण्णा सोसायटीचा तपास पूर्ण झाला असून भिमाम्बिकाचा तपास रखडला होता. आता तो पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती मिळाली आहे.









