प्रकाश इंगळगी वि. विश्वजित रुपनर यांच्यात प्रमुख लढत
बेळगाव : चुडाप्पा हलगेकर कुस्ती प्रोत्साहन समिती, पाटील गल्ली आयोजित मोफत निकाली कुस्त्यांचे मैदान रविवार दि. 16 रोजी आनंदवाडी आखाड्यात आयोजित करण्यात आले आहे. सदर कुस्ती मैदानात प्रमुख कुस्ती कर्नाटक चॅम्पियन प्रकाश इंगळगी व कराडच्या विश्वजित रुपनर यांच्यात होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती पार्थ पाटील-कंग्राळी वि. आदित्य पाटील-सांगली यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती पृथ्वीराज पाटील-कंग्राळी वि. समर्थ-खडकलाट यांच्यात, चौथ्या क्रमांकाची कुस्ती प्रथम हट्टीकर-कंग्राळी वि. विकास अंकलगी, पाचव्या क्रमांकाची कुस्ती हणमंत-घटप्रभा वि. निखिल पाटील-कंग्राळी, सहाव्या क्रमांकाची कुस्ती महेश बिर्जे-तीर्थकुंडये वि. सुरेश-अथणी, सातव्या क्रमांकाची कुस्ती विनायक येळ्ळूर वि. साईनाथ नाईक-कंग्राळी, आठव्या क्रमांकाची कुस्ती शिवम बाळेकुंद्री-कडोली, चिन्मय-येळ्ळूर, नवव्या क्रमांकाची कुस्ती तुकाराम डुकरे-किणये वि. हर्ष पाटील-कंग्राळी, दहाव्या क्रमांकाची कुस्ती भूमीपुत्र-मुतगा वि. यश-कोरे गल्ली यांच्यात होणार आहे. या शिवाय लहान मोठ्या 70 हून अधिक कुस्त्या होणार आहेत.









