वृत्तसंस्था / कोस्टा नेव्हारिनो
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती अध्यक्षपदी क्रिस्टी कॉव्हेंट्री यांची निवड करण्यात आली आहे. 2036 च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी भारताने दावा केला असून आता कॉव्हेंट्रीकडून भविष्य काळात ऑलिम्पिक स्पर्धा यजमानाची निवड करण्यासाठी नवे निकष सादर केले जातील, असा अंदाज आहे.
गुरुवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीमध्ये 41 वर्षीय कॉव्हेंट्री यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. जागतिक क्रीडा क्षेत्रामध्ये मोठी जबाबदारी आता पहिल्या दक्षिण आफ्रिकेच्या महिलेवर सोपविण्यात आली आहे. 23 जून रोजी कॉव्हेंट्री आपल्या नव्या पदाची सूत्रे हाती घेणार आहेत. 23 जून हा जागतिक क्रीडाक्षेत्रामध्ये ऑलिम्पिक दिवस म्हणून साजरा केला जातो. आयओसीचे विद्यमान अध्यक्ष थॉमस बाक यांचा अध्यक्षपदाचा कालावधी 23 जून रोजी समाप्त होणार आहे. 2036 च्या ऑलिम्पिक स्पर्धा यजमानपदासाठी किमान 10 देश इच्छुक असून कतार आणि सौदी अरेबिया यांचाही त्यात समावेश यामध्ये आहे.









