वृत्तसंस्था/ पॅरीस
एटीपी टूरवरील येथे झालेल्या मॅर्लोका खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या 27 वर्षीय ख्रिस्टोफर युबँक्सने एकेरीचे अजिंक्यपद पटकावताना अॅड्रीयन मॅनेरिनोचा पराभव केला.
शनिवारी झालेल्या पुरुष एकरीच्या अंतिम सामन्यात युबँक्सने मॅनेरिनोववर 6-1, 6-4 अशी मात केली. एटीपी टूरवरील स्पर्धेतील युबँक्सचे हे पहिले विजेतेपद आहे. युबँक्सने हा अंतिम सामना 62 मिनिटात जिंकला. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेत युबँक्सचा सलामीचा सामना ब्राझीलच्या माँटेरियोशी होणार आहे.









