वृत्तसंस्था / गुरूग्राम
येथे झालेल्या गुरूग्राम आयटीएफ महिलांच्या टेनिस स्पर्धेत 21 वर्षीय ख्रिस्टीना डिमिट्रुकने एकेरीचे जेतेपद मिळविताना मॅकरोव्हाचा अंतिम सामन्यात पराभव केला.
30 हजार डॉलर्स एकूण बक्षीस रक्कमेच्या या स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ख्रिस्टीनाने मॅकरोव्हाचा 6-3, 6-2 अशा सरळ सेटमध्ये फडशा पाडत जेतेपद पटकाविले. या स्पर्धेत 29 वर्षीय मॅकरोव्हाने रेनगोल्ड समवेत महिला दुहेरीचे जेतेपद पटकाविले. 2021 साली कनिष्ट गटातून आपल्या टेनिस कारगिर्दीला प्रारंभ करणाऱ्या ख्रिस्टीनाने अंतिम सामन्यात बेसलाईन आणि वेगवान सर्व्हिसवर भर दिला होता. ख्रिस्टीनाने हा अंतिम सामना 80 मिनिटांत जिंकला. व्यावसायिक टेनिस क्षेत्रातील ख्रिस्टीनाचे हे सहावे विजेतेपद आहे.









