चेन्नई : अभिनेता- राजकारणी बनलेले कमल हसन ( Kamal Hasan ) यांनी दिग्दर्शक वेत्रीमारनच्या ( Vetrimaran ) चोल राजा हे हिंदु नव्हते या विधानाचे समर्थन केले आहे. त्यांनी चोल युगात हिंदू धर्म नावाची कोणतीही संज्ञा नव्हती असे नवीन विधान केले आहे.
काही दिवसापुर्वी तामिळ दिग्दर्शक वेत्रिमारन एका कार्यक्रमात म्हणाले होते की, “सातत्याने आमची चिन्हे आमच्याकडून हिसकावून घेतली जात आहेत. वल्लुवरचे भगवेकरण करणे किंवा राजा राजा चोलन यांना हिंदू राजा म्हणण्याचे प्रकार घडत आहेत.” वेत्रीमारन यांनी सिनेमा हे सर्वसामान्यांचे माध्यम असल्याने, प्रत्येकाच्या प्रतिनिधित्वाचे रक्षण करण्यासाठी राजकारण समजून घेणे महत्त्वाचे आहे असेही म्हटले होते.
यावर “राजा चोलन काळात हिंदू धर्म असा कोणताही प्रकार नव्हता. त्याकाळी वैनवम, शिवम, आणि समानम होते. त्यांना एकत्रितपणे संदर्भित करण्यासाठी ब्रिटीशांनीच हिंदू ही संज्ञा तयार केली. थुथुकुडीचे तुतीकोरीनमध्ये जसे रूपांतर केले त्यासारख्याच या गोष्टी घडत गेल्या. कमल हसन यांनी सांगितले. त्या काळात अनेक धर्म होते आणि 8 व्या शतकात अधिशंकराने षण्मधा स्तबनमची निर्मिती केली असेही ते म्हणाले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








