बांधाच्या दुऊस्तीमुळे 15 वर्षानंतर शेतकरी लागले शेतीच्या कामाला : कृषी अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना येतेय यश

जुने गोवे : शासनाने कोट्यावधी ऊपये खर्च करून बांधांची दुऊस्ती केलेल्या चोडण येथील कावा खाजन आणि कांतोर खाजन शेत जमिनीत शेतकऱ्यांनी भात पीक घेण्याच्या प्रक्रियेला सुऊवात केली आहे. त्यामुळे गेली 15 वर्षे पडिक असलेल्या या जमिनीवर सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत सोनेरी कणसे फुलणार आहेत. कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या घरापर्यंत जाऊन सरकारच्या योजना समजावून सांगत शेतकऱ्यांना या खाजन शेतजमिनीत शेती करण्यासाठी दिलेल्या प्रोत्साहनाला यश येत असल्याचे तेथे फेरफटका मारल्यानंतर दिसून येत आहे.

मार्च महिन्यात कृषी खात्याचे संचालक नेविल आफांसो यांनी चोडण गावाला भेट दिली. शेतकऱ्यांची बैठक घेऊन पडिक शेतजमिनी पुन्हा फुलविण्याची विनंती केली. तसेच शेतकऱ्यांना बरोबर घेऊन प्रत्यक्ष खाजनांत भेट देऊन शेतकऱ्यांकडून आढावा घेण्याचा प्रयत्न केला. कृषी खात्याच्यावतीने 50 टक्के सवलतीच्या दराने शेतजमीन ट्रक्टरद्वारे खणून देण्याच्या योजनेची तसेच या खाऱ्या पाण्याच्या जमिनीत पेरण्यासाठी खास बियाणे पुरविण्याच्या योजनेची माहिती उपस्थित शेतकऱ्यांना दिली. 34 ऊपये प्रति किलो दर असलेले बियाणे शेतकऱ्यांना फक्त 4 ऊपये प्रति किलो दराने तर शेतजमीन ट्रक्टरद्वारे खणण्यासाठी 800 ऊपये प्रति तास ऐवजी 400 ऊपये प्रति तास दराने खणुन देण्यात येईल तसेच पूर्वी पैसे भरण्यासाठी शेतकऱ्यांना खात्याच्या जुने गोवे कार्यालयात किंवा पणजी येथील प्रधान कार्यालयांत जाऊन पैसे भरावे लागत होते. पण आता चोडण गावातच पैसे स्वीकारण्याची सोय करण्यात आल्याची माहिती तिसवाडी विभागीय कृषी अधिकारी रोशल फर्नांडिस, साहाय्यक कृषी अधिकारी निखिल माजिक यांनी कातोर खाजनांत उपस्थित शेतकरी तसेच पंचायत सदस्य व पत्रकारांना दिली. यावेळी शेती सहाय्यक उदय तेजाम यांचीही उपस्थिती होती.

कांतोर खाजन शेतीच्या कामांना सुऊवात
कांतोर खाजनातील बहुतेक शेतकऱ्यांनी पुन्हा शेती करण्यासाठी उत्साह दाखवला असून शेतजमीन खणून घेण्यासाठी सुऊवात ही केली आहे. आतापर्यंत सुमारे तीस हजार चौरस मीटर जमिन खणून घेतल्याची माहिती तिसवाडी विभागीय कृषी अधिकारी रोशल फर्नांडिस यांनी दिली. कातोर खाजनातील शेतकऱ्यांनी शेतीच्या इतर कामांना देखील सुऊवात केली आहे. जसे की शेतजमिनीत वाढलेली झाडी कापणं, आपापल्या शेतजमिनी भोवती काटूक काढणं (काटूक म्हणजे शेतजमिनीत खारे पाणी भरून राहू नये यासाठी पोयच्या चिखलाचा उंचवटा उभारणं) इत्यादी कामांना जोमाने सुऊवात केली आहे. जूनच्या मध्यापर्यंत येथे भात बियाणे पेरले जाईल व सुमारे पंधरा वर्षांच्या खंडानंतर सप्टेंबर महिन्यात नक्कीच भाताची कणसे लोंबकळत असलेली दिसतील.

कावाखाजनात अडचणींचा डोंगर तरी प्रयत्न सुऊ
कावाखाजन शेतजमिनीची परिस्थिती मात्र याच्या उलट आहे. कारण अनेक वर्षे (जवळजवळ पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ) ही जमिन पडिक राहिल्याने शेतजमिनीत मिनी अभयारण्य तयार झाले आहे. खाऱ्या पाण्यात वाढणारी अनेक प्रकारांची झाडं येथे तयार झाली आहेत. शेतकरी शेती करण्यासाठी तयार झाले आहेत पण वाढलेल्या विविध प्रकारच्या झाडांमुळे शेतजमीन कशी खणावी हा त्यांच्या समोर मोठा प्रŽ आहे. जी जमीन साफ होती, ती जमीन एक – दोन शेतकऱ्यांनी आतापर्यंत खणुनही घेतली आहे. पण ज्यां जमीनीवर झाडे वाढलेली आहे त्याचे काय करायचे याचा निर्णय कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर घेऊन झाडं कापून जमीन साफ करण्याचे प्रयत्न करावे. नाही तर त्यांनी एवढी धडपड कऊन काहीचं फायदा होणार नसल्याचे काही शेतकऱ्यांनीच सांगितले.

कावाखाजनात खारे पाणी शिरण्याची शक्यता

कावा खाजनाच्या बांधाची दुऊस्ती शासनाने कोट्यावधी ऊपये खर्च करून केली आहे. पण काही ठिकाणी बांधकाम अगदी निकृष्ट दर्जाचे असल्याचे जाणवते. म्हापसा नदीच्या बाजूला बांधकामासाठी जो पायां घातलेला आहे तेथे सिमेंट काँक्रिट घालून चांगले प्लास्टर करायला हवे होते पण तसे न करता नुसत्या दगडांवर काँक्रीटचा थर दिलेला आहे. खालुन बांधाला भोक पडण्याची शक्मयता असते व शेतजमिनीत खारे पाणी शिरण्याची शक्मयता असते. याची दखल घेतली नाही तर त्या जाग्यावर बांधाला भगदाड (खावटें) पडू शकते म्हणजेच येरे माझ्या मागल्या असे घडण्याची शक्मयता आहे. दुसरी गोष्ट म्हणजे कावा खाजनाच्या बाजूलाच बुडे कांतोर खाजन आहे. बुडे कांतोर खाजन बाराही महिने मासे पिकविण्यासाठी पाण्याने भरलेले असते त्यामुळे कावा खाजनाच्या दुऊस्त केलेल्या बांधाला धोका निर्माण होऊ शकतो. याचाही कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दखल घ्यायला हवी असे काही शेतकऱ्यांनीच सांगितले.
वाढलेली झाडी कापून देण्याची शेतकऱ्यांची मागणी

पावसाळा अगदी जवळ येऊन ठेपला आहे तेव्हा कावा खाजन शेतजमिनीत वाढलेली झाडी कापून तेथे शेती करण्यासाठी मिळेल का? असा प्रŽ शेतकऱ्यांना पडल्यास नवल नाही. शेती करा, शेती करा आम्ही सवलत देऊ असे सांगून काहीच होणार नाही. शेतजमीन खणण्यासाठी आधी जमीन साफ व्हायला हवी असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कृषी खात्याचे अधिकारी ज्या तळमळीने खाजन शेतजमिनीत पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना तयार करण्यात धडपडतात त्याच तळमळीने वाढलेली झाडी कापून लवकरात लवकर शेतकऱ्यांना जमीन साफ करून देण्याचा प्रयत्न करावे नाहीतर आणखी काही वर्षे खाजन शेतजमिनी पडिकच राहील.









