वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बुधवारपासून बँकॉकमध्ये सुरु होणाऱ्या आशियाइ अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतून भारताचे अॅथलिट प्रवीण चित्रावेल आणि भालाफेकधारक रोहित यादव यांनी दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्याचप्रमाणे भारताचा अव्वल अॅथलिट जेसविन अल्ड्रिन यालाही भारतीय संघामध्ये वगळण्यात आले आहे.
या स्पर्धेसाठी भारतीय अॅथलेटिक्स संघाने शनिवारी रात्री दिल्ली येथून बँकॉकला प्रयाण केले आहे. या संघासमवेत प्रवीण चित्रावेल आणि रोहित यादव नसल्याचे सांगण्यात आले. 22 वर्षीय रोहित यादवने अलिकडेच फेडरेशन चषक त्याचप्रमाणे आंतरराज्य अॅथलिटिक्स स्पर्धेत भालाफेकीत सुवर्णपदक मिळविले आहे. त्याचप्रमाणे बँकॉक स्पर्धेसाठी भारतीय संघासमवेत मोहम्मद अनास आणि अंजलीदेवी यांचा सहभाग नसल्याचे सांगण्यात आले.









