वृत्तसंस्था/ ग्लास्गो
येथे सुरू असलेल्या विश्व अॅथलेटिक्स इनडोअर चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचा अॅथलिट प्रवीण चित्रावेलला पुरूषांच्या तिहेरी उडीत अकराव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
या क्रीडा प्रकारात 22 वर्षीय चित्रावेलने 16.45 मी. चे अंतर नोंदविले. त्याने यापूर्वी या क्रीडा प्रकारात 17.37 मी. चा राष्ट्रीय विक्रम नोंदविला होता. गेल्या वर्षी झालेल्या हाँगझाऊ आशियाई स्पर्धेत चित्रावेलने 16.68 मी. चे अंतर नोंदवित कांस्यपदक मिळविले होते. ग्लॅस्गोच्या स्पर्धेत युजेस फॅब्रीसी झेंगोने 17.53 मी. चे अंतर नोंदवित सुवर्ण, अल्झेरियाच्या यासिर त्रिकीने 17.35 मी. चे अंतर नोंदवित रौप्य तर पोर्तुगालच्या टी. परेराने 17.08 मी. चे अंतर नोंदवित कांस्यपदक घेतले.









