सांखळी/प्रतिनिधी
खेडेकर सभागृह हा चित्रांचं दालन आहे. प्रयोगशीलता अभय जोग चित्रकथी हे संपूर्ण गोव्यात जायला हवे. गोव्यातील पहिला प्रयोग पाहण्याचे भाग्य मला लाभले. कलेशिवाय माणूस नाही यासाठी जीवनात एक तरी कला असायला हवी .ती भविष्यात आपल्याला उपयोगी पडते. तसेच रामायण, महाभारत हे मोठे ग्रंथ यापासून खूप काही शिकता येते. 64 कला 14 विद्या कलेला कधीही भीती नाही. अतराष्ट्रीय पातळीवर सामाजिक संस्कृतीचे नाते मित्र बंधन प्रफुल्लीत करणारा सम्राट क्लब, आहे, असे उद्गार तरुण भारतचे संपादक सागर जावडेकर यांनी या कार्यक्रमात व्यक्त केले. सम्राट क्लब सांखळीतर्फे रविवार खेडेकर हॉल सांखळी येथे रंगमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद लाभला. प्रास्ताविक मोनाली बेतकीकर यांनी केले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. यानिमित्त सम्राट क्लब तर्फे क्रिकेटपटू सेजल सातार्डेकर सन्मान करण्यात आला.
यावेळी तरुण भारतचे संपादक सागर जावडेकर, शिवानंद खेडेकर, अभय जोग, अध्यक्ष मोनाली बेतकीकर,सुनीता वरेकर, सुजय कोल्हापूरकर, कुष्ठा सातरडेकर शैलेंद्र बोरकर याची व्यासपीठावर उपस्थिती होती. यात अभय थिएटर अकादमी निर्मित ’ चित्रकथी अमृतम गमय ’ हा कै .वा.रा.कांत यांच्या मरणगंध या काव्यनाट्यावर आधारित रंग-चित्र-संगीत-वाद्य- अभिनय यांचा मिलाफ असलेला एक आगळा वेगळा लोकरंग अविष्कार कार्यक्रम सादर करण्यात आला.संकल्पना, संगीत व दिग्दर्शन अभय जोग यांचे होती. चित्ररेखाटन क्रांती च्यारी, निर्मिती साहाय्य शिवानंद खेडेकर यांचे असून , समन्वयक प्रा. सुनिता वेरेकर या होत्या. यात यदनाथ शिरोडकर, सौमिनी मोने व नेहा उपाध्ये यांचा सहभाग आहे. सतारवर लक्ष्मीकांत खांडेकर, पखवाजवर गजानन नार्वेकर व मंजिरीवर घुनाथ च्यारी यांनी संगीतसाथ केली. अभय जोग यांनी या कार्यक्रम विषयावर सविस्तर माहिती दिली. या कार्यक्रमासाठी विविध महाभारत विषयावर चित्रकडून कथानक सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभदा सावईकर यांनी केले.









