भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी मुंबईच्या रस्त्यावर अर्धनग्नावस्थेत फिरणाऱ्या उर्फी जावेद या सोशल मीडिया सेलीब्रेटीविरोधात तक्रार केली आहे. अलीकडेच, उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून ती जीन्ससह काळ्या रंगाचा कटआउट टॉप परिधान करून मुंबईत रस्त्यावर फिरताना दिसली होती.
त्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विटरवर “सार्वजनिक ठिकाणी नग्नतेचा” आरोप करून उर्फीला अटक करण्याची मागणी केली. “मुंबईत काय चालले आहे? मुंबईच्या रस्त्यावर उघडपणे नग्नता करणाऱ्या या महिलेला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे आयपीसी / सीआरपीसी कलमे आहेत का? तिला लवकरात लवकर अटक करा.” ती पुढे म्हणाली, “एकीकडे निष्पाप मुली / स्त्रिया विकृतांना बळी पडत आहेत आणि दुसरीकडे ही महिला आणखी विकृती पसरवत आहे.”वाघ यांनी ट्विट केले.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडे हे निवेदन दिले. त्यांनी सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर करून ”मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या #उर्फीजावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे मा.@CPMumbaiPolice तसेच सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली” असे ट्वीट केले.
Previous Articleहिवाळ्यात केसांच्या समस्या जाणवत आहेत? मग घरच्या घरी बनवा हे तेल
Next Article सांस्कृतिक कार्यक्रमातून कौशल्य विकसीत करा !









