Chitra Wagha And Uorfi Javed : सार्वजनिक ठिकाणी नंगानाच आम्हाला मान्य नाही. उर्फी जावेदने नीट कपडे घालून महिला आयोगात जावं. हा समाजस्वास्थाचा विषय आहे. समाजात असणाऱ्या विकृती हटल्या पाहिजेत. चार भिंतीच्या आत काय करायचे आहे ते करा, तुम्हाला स्वातंत्र आहे. पण सार्वजनिक ठिकाणी तुम्ही अस वागू शकत नाही. स्वातंत्र्याच्या नावावर चाललेला स्वैराचार खपवून घेणार नाही असा इशारा आज भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदला दिला.
माझी भुमिका समाजस्वास्थाच्या विषयावर आहे. हा राजकीय विषय नाही. या विषयावर लढताना मला घेरण्याचा प्रकार केला जात आहे. मात्र तरीही माझा विरोध राहणारचं. माझ भांडण उर्फी जावेदशी नाही तिच्या विकृतीशी आहे. माझा विरोध काल होता आणि उद्याही असणार आहे. रुपाली चाकणकरांना हा नंगानाच मान्य आहे का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.
चित्रा वाघला विरोध करा.राजकारण्याच्या मुद्यावर तुम्ही बोला मला प्रश्न करा मी उत्तर द्यायला समर्थ आहे. पण समाजस्वास्थाच्या विषयावर काम करत असताना मला घेरण्याचं काम सुरू आहे. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही. तुमच्यात जेवढा दम असेल तो लावा.पण मी महाराष्ट्रात नंगानात चालू देणार नाही. मी एकाकी पडले नाही. महाराष्ट्रातील जनता माझ्यासोबत आहे. रोज मी वेगवेगळ्या जिल्ह्यात जाते. दादा, काका, मामा, आया-बाया सगळे थांबून मला सांगतायत, चित्रा ताई तुम्ही चांगला मुद्दा घेतला, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








