क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
गदग येथे सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे घेण्यात आलेल्या विभागीय हॅण्डबॉल स्पर्धेत बेळगाव विभागाच्या जीजी चिटणीस संघाला उपविजेत्या पदावर समाधान मानावे लागले. गदग येथे झालेल्या या स्पर्धेत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बेळगाव जिल्हा संघाने चिकोडी जिल्हा संघाला 7-6 अशा गोलफरकाने पराभव केला. वेदांत सुतारने 5 तर अद्वेद किल्लेकरने 2 गोल केले. अंतिम सामन्यात बलाढय़ हावेरी जिल्हा संघाने बेळगाव जिल्हा संघाचा 18-11 अशा गोलफरकाने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. या सामन्यात बेळगावच्या चिटणीस संघाला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. बेळगावतर्फे राज मुचंडीने 5, अद्वेद किल्लेदारने 3, वेदांत सुतारने 2 तर पुष्पकने 1 गोल केला. या विजेत्या संघाला शाळेचे क्रिडाशिक्षक जयसिंग धनाजी यांचे मार्गदर्शन तर मुख्याध्यापिका डॉ. नविना शेट्टीगार व शाळेचे अध्यक्ष ऍड. चंद्रहास अन्वेकर यांचे प्रोत्साहन लाभले आहे.









