चिपळूण: गेल्या दहा दिवसांपासून सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला परशुराम घाट सुरू करण्या संदर्भात जिल्हा प्रशासन कोणताच निर्णय घेत नसल्याने वाहनचालकांसह नागरिकही आता संतापले आहेत. 12 जुलैच्या मध्यरात्री बंदी आदेश संपल्यानंतरही अद्याप कोणत्याच सूचना प्रशासनाकडून आलेल्या नाहीत. परिणामी शाळांच्या सुट्टया वाढवण्यात आल्या असून अवजड वाहनेही दोन्ही बाजूला अडकून आहेत. त्यामुळे घाटाबाबत प्रशासनाचा सुरू असलेला खेळ कधी संपणार असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाचा जोर वाढला आहे. यामध्येच गेल्या सोमवारी परशुराम घाटात दरडी कोसळल्याने आणि माथ्यावरील जमिनीला तडे गेल्याने हा घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. घाट बंदमुळे अडकून पडलेल्या अवजड वाहनांना दोन दिवसांनी सायंकाळच्या सुमारास सोडले जात आहे. मात्र अन्य वाहतूक आंबडस-चिरणी लोटेमार्गे सुरू आहे. घाटबंद असल्याने पसिरातील शाळांना सुट्टी देण्यात आली असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. परशुराम ग्रामस्थांचे तर जगणेच कठीण होऊन बसल्याने घाट वाहतुकीसाठी कधी मोकळा होईल अशी विचारणा होत आहे. तसेच सर्वांच्या नजरा प्रशानाच्या निर्णयाकडे आहेत.
हेही वाचा- उधाणाने किनारपट्टीवर दाणादाण!लगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा
मंगळवारी मध्यरात्री घाट बंद आदेशाची मुदत संपल्यानंतर कोणतेच आदेश प्रशासनाकडून न आल्याने बुधवारी सकाळपासून घाट सुरू होण्याची शक्यता होती. मात्र पोलिसांनी परवानगी पत्र नसल्याचे सांगत वाहनांना बुधवारी
सकाळी अटकाव केला. त्यानंतर दिवसभरात प्रशासनाकडून घाट सुरू अथवा बंद करण्याबाबत कोणतीच माहिती दिली गेली नाही. प्रशासनाच्या या भूमिकेवरून नागरिक व वाहनचालकांत संतापाची लाट पसरत आहे.
हेही वाचा- दैव बलवत्तर म्हणून वाचला जीव ! कशेडी घाटात मालवाहू ट्रकचे झाले दोन तुकडे
घाट बंदमुळे परिसरातील शाळा गेल्या दहा दिवसांपासून बंद आहेत.घाटाबाबत प्रशासन कोणताच निर्णय घेत नसल्याने शाळांच्या सुट्टया वाढवण्यात आल्या आहेत. दीड हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना याचा फटका बसला
आहे. मात्र प्रशासन कोणतीच भूमिका घेताना दिसत नाही. राष्ट्रीय महामार्ग पेण विभाग आणि स्थानिक प्रशासनाने घाट सकाळी 6 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत सुरू ठेवून रात्री वाहतुकीस बंद ठेवावा असा अहवाल जिल्हाधिकाऱ्या मंगळवारी सादर केला आहे. मात्र परिवहन आणि पोलीस अधिकाऱ्यांचा अभिप्रायही
जिल्हाधिकाऱ्यांनी मागवल्यानंतर बुधवारी सकाळी महामार्गसह सबंधित दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी घाटाची पाहणी केली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत घाटासंदर्भात कोणताच निर्णय प्रशासनाकडून जाहीर केलेला नाही.
Previous Articleचिपळुणात वाशिष्ठीसह शिवनदीचे पाणी पात्राबाहेर
Next Article शिरवली परिसरात गवा रेड्याचा धुमाकूळ









